खालापूर: खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या निमित्ताने खोपोली शहरातील महायुती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न
आज दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता प्रभाग क्रमांक 10 , प्रभाग क्रमांक 11, प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 4 , प्रभाग क्रमांक 05, प्रभाग क्रमांक 06 महायुती प्रचार कार्यालयाचे उद्घाटक आमदार प्रशांत ठाकूर ,आमदार महेंद्र थोरवे व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे व नगरसेवक पदाचे उमेदवार शिवसेना, भाजपा, आर.पी.आय सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. या प्रसंगी बोलताना आमदार महेंद्र थोरवे खोपोलीकर विकासाला मत देत आहेत खोपोली करांनी उस्फूर्तपणे मताचे दान टाकून मला आमदार केलं त्याचप्रमाणे कुलदीपक शेड खोपोलीचे नगराध्यक्ष होणार व सर्व उमदेवार निवडून येतील हा ठाम विश्वास व्यक्त केला.