जिवती तालुक्यातील शेतकरी मे जून महिन्यांमध्ये पीक कर्जासाठीच भारतीय स्टेट बँक शाखा पाटण येथे अर्ज सादर केले होते परंतु सहा महिने होऊन सुद्धा आतापर्यंत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नसून याकरिता 22 डिसेंबर रोज सोमवारपासून भारतीय स्टेट बँक पाटण समोर सर्व शेतकरी साखळी उपोषण करणार आहेत असे आव्हान आज 19 डिसेंबरला सकाळी 11 वाजता जिवती तालुका अध्यक्ष सुदाम राठोड यांनी केलेत तसेच तहसीलदार यांना निवेदन दिले