लासलगावजवळील विचूर परिसरात आज पहाटे विंचूर गटूर कंपनीत अचानक आग लागल्याची धळक घटना घडली आहे. चांदवड येथील वर्धमान छाजेड यांच्या मालकीच्या या कंपनीत बॉयलरसाठी तयार करण्यात येणाऱ्या मक्याच्या बिट्यांचा मोठा साठा होता. याच साठ्याला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच लासलगाव येथील सिद्धवीर हनुमान मित्र मंडळाचा टँकर सर्वप्रथम घटनास्थळी दाखल झाला आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर निफाड, चांदवड आणि मनमाड येथील अग्निशामक दलाचे पथकही तातडीने दाखल झाले.