नंदुरबार शहरात साक्री नाका परिसरात उरूस हा मुस्लिम बांधवांचा सला निमित्त मोठी यात्रा भरत असते. यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी जमा होते. शहरात येणाऱ्या मार्गावरून वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. वाहनांचा धक्का लागल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे दि.६ जुलै च्या सकाळी सहा वाजेपासून ते १२ जुलैच्या सकाळी आठ पर्यंत या मार्गावरील वाहन वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून माहिती प्राप्त झाली आहे.