गुरढा येथे सूडाच्या भावनेतून एका ५६ वर्षीय प्रौढावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्याचे डोके फोडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी राजेश चंदन गोंडाणे हे २० जानेवारी रोजी सकाळी ९:१५ च्या सुमारास घरून ब्लेड आणण्यासाठी दुकानात जात असताना, आरोपी धीरज खुशाल गोंडाणे (वय ३२) याने त्यांना सार्वजनिक रस्त्यावर अडवले. "तू जुन्या भांडणात माझ्याविरुद्ध साक्ष का दिलीस?" असा जाब विचारत आरोपीने अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.