राज्य राखीव पोलीस बलाचा ७८ वा वर्धापन दिन जालना येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 3 च्या परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी राज्य राखीव पोलीस बलाच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सेवाभावी व धैर्यशील कार्याचे कौतुक केले. शुक्रवार दि. 6 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमास जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. मिन्नू, समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 3 उपस्थित होते.