पेठ: टाळमृदुंगाच्या गजरात पेठ तालुक्यातून वारकरी दिंड्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर कडे झाल्या मार्गस्थ
Peint, Nashik | Jan 9, 2026 हातात टाळ , गळ्यात विणा , डोईवर तुळस घेऊन मुखी हरिनामाचा गजर करीत वारकरी दिंड्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर कडे मार्गस्थ झाल्या आहेत. मजल दरमजल करीत भजन कीर्तन प्रवचन करीत दिंड्या निघाल्या आहेत.