अर्जुनी मोरगाव: सडक अर्जुनी तालुका बौद्ध समाज संघ तर्फे तहसील कार्यालय सडक अर्जुनी येथे देण्यात आले निवेदन
बुद्धगया टेम्पल अॅक्ट १९४९ रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या स्वाधीन करा, तथा भंते विनाचार्य यांच्या बेकायदेशीर अटकेचा विरोध करीत त्यांची तुरूंगातून सुटका करा, या मागणीसाठी २१ मे रोजी तालुका बौद्ध समाज संघ सडक अर्जुनी तसेच बौद्ध बांधवांच्या वतीने संबोधी बुद्ध विहार येथून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली व तहसीलदार मार्फत भारताचे महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले.