वेगातील एका कारने मेंढ्यांच्या कळपाला चिरडल्याने पाच मेंढ्यांचा मृत्यू झाला तर काही मेंढ्या जखमी झाल्याची घटना बुलढाणा रोडवरील दिवठाणा फाट्यानजीक आज दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजे दरम्यान उघडकीस आली आहे. मेंढपाळ मेंढ्यांना चरायला घेवून जात असतांना दिवठाणा नजीक एका वेगातील कारच थेट मेंढ्यांच्या कळपात शिरली. या अपघातात काही मेंढ्या चिरडल्या गेल्या असून यातील पाच मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. तर काही मेंढ्या गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. यामुळे मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले.