नाशिक तालुक्यातील विल्होळी येथील आदिवासी वस्तीला अखेर पिण्याचे पाणी मिळाले आहे. एल्गार कष्टकरी संघटनेने वर्षभर केलेल्या सातत्यपूर्ण आंदोलनानंतर हा मार्ग मोकळा झाला. पंचायत समितीने सुरुवातीला पाणीपुरवठ्यास नकार दिल्यानंतर संघटनेच्या वतीने हंडा मोर्चा काढून निषेध करण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. “शासकीय जागेवर राहत असले तर