बंदुकीच्या गोळीने पती, जेठ व जेठाणीला संपवून टाकेल अशी धमकी देवून विवाहितेचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना अमळनेर तालुक्यातील पातोंडा गावात मंगळवारी १३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.