जालना तालुक्यातील मौजपुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळा या अत्यंत जिर्ण झाल्या असून त्या मोडकळीस आल्या आहेत.विद्यार्थ्यांना जिव मुठीत धरुन ज्ञानार्जन करावे लागत आहे. त्यामुळे शाळेची दुरुस्ती करुन नव्या इमारतीचे काम मंजुर करावे यासाठी गावकर्यांनी वारंवार पाठपुरावा केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने शनिवार दि.5 जुलै 2025 रोजी दुपारी 12 वाजता गावकर्यांनी शाळेच्या कामासाठी आत्मदहनाचा इशारा दिलाय. यावेळी सरपंच बद्रीनारायण भसांडे यांनी देखील आक्रमक पावित्रा घेतला असून आत्मदहन करणार आहेत.