जत - विजयपूर मार्गावर जतपासून साडेसात कि.मी.अंतराव असलेल्या लिंग ढाब्याजवळ कामगोडा आवटी मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात कनमडी (जि. विजापूर) येथील माजी सैनिक कामगोडा रायगोंडा आवटी (वय ५०) यांचा मृत्यू झाला. ही घटना काल, सोमवारी दुपारी घडली. आज 13 मे रोजी सकाळी अकरा वाजता उशिरा या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली.