तेल्हारा: सौंदळा येथे यात्रेनिमित्त शांतता सभा उत्साहात
Telhara, Akola | Apr 21, 2024 सौदळा येथे २४ एप्रिल रोजी देवीची यात्रा भरत असून, यात्रेच्या बंदोबस्तासाठी व शांततेत यात्रा व्हावी, यासाठी आज संध्याकाळी 5 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेमध्ये यात्रा ही शांततेत पार पाडावी, असे आवाहन हिवरखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार पांडव यांनी केले. तसेच यात्रेमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या व मस्ती करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही सभेमध्ये सांगण्यात आले. सभेसाठी देवी संस्थानचे अध्यक्ष नवलकुमार अरबट, सरपंच विनोद मिरगे व नागरिक उपस्थित होते