बुलढाणा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा दौरा
नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचार सभेसाठी २५ नोव्हेंबर रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. अकोला जिल्ह्यातील सभा दुपारी आटोपल्यानंतर ते हिवरखेड येथून चिखली येथे पोहोचतील. चिखलीत दुपारी ३.१५ वाजता त्यांची प्रचारसभा आहे. ती आटोपल्यानंतर ४ वाजताच्या सुमारास ते हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगरला रखाना होतील.अशी माहिती २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता प्राप्त झाली आहे.