भद्रावती नगरपरीषदेची सार्वत्रिक निवडणूक येत्या 2 डिसेंबरला होत आहे.निवडणुकिची प्रक्रीया अंतिम टप्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर शहरातील विवीध राजकीय पक्षांनी बाळासाहेब ठाकरे प्रवेशव्दार ते नागमंदीर चौकापर्यंत मिरवणुका काढुन आपले शक्तीप्रदर्शन केले व मतदारांना आपल्या उमेदवारांना निवडून आनण्याचे आवाहण केले. निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला जाहिर करण्यात येणार आहे.