समुद्रपूर: उंदीरगाव शिवारात पट्टेदार वाघाचे वास्तव्य, नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण; वनविभागाचे दोन पथक वाघाच्या मार्गावर
समुद्रपुर: खुर्सापार जंगलातून शेतशिवारात भटकंती करीत निघालेल्या वाघाने एकाच शिवारात मुक्काम ठोकला आहे.त्यामुळे उंदीरगाव – अंतरगाव परिसरातील गावात दहशत पसरलेली आहे.९ जुलैच्या मध्यरात्री उंदीरगावात गोठ्यात शिरकाव करून एका गोऱ्याला ठार केल्यावर सतत दोन दिवस वाघाने शिकार खाऊन मुक्काम ठोकला.आज शनिवारी सायंकाळी ५ वाजता वाघ या शिवार असल्याची चर्चा आहे.वाघाच्या मागावर वनविभागाचे दोन पथक कार्यान्वित करण्यात आले असून वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे.