वैजापूर शहरातील बीएसएनएल रोडवरील भूमी अभिलेख कार्यालय समोरील डीपीवर काम करत असताना कंत्राटी झिरो वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार ता.16 रोजी दुपारच्या सुमारास घडली. सोमनाथ आसाराम पानडघळे वय 29 वर्षे राहणार आघुर असे घटनेतील मयत तरुणाचे नाव आहे.