न्यायालयाने बांधकामासाठी मनाई केली आहे असे सांगितल्याच्या रागातून पती-पत्नी व मुलावर चाकूने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील सारबेटे येथे शुक्रवारी १६ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता घडली आहे. याबाबत रविवारी १८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.