परळीतील कुख्यात कैलास फड याचे आणखी एक कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या नव्या ऑडिओमध्ये तो एका व्यक्तीला तात्काळ कुणाला तरी कॉन्फरन्स कॉलवर घेण्याचे आदेश देताना ऐकू येतो. कॉन्फरन्सवर न घेतल्यास 'माझी पोरं तिथे पोहोचली आहेत, त्याला मारतील' असा धमकीवजा इशारा देतानाचाही आवाज रेकॉर्डिंगमध्ये आहे. दरम्यान, कैलास फड हा राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा मानला जात असल्याची माहिती स्थानिक पातळीवर चर्चेत आहे. या व्हायरल झालेल्या कॉलमुळे परळीत पुन्हा एकदा खळबळ उडाली.