उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौका जवळ जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी कारवाई करून एकावर गुन्हा दाखल केला आहे, छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या बाजूला आरोपींने बेकायदेशीर रित्या स्वतः च्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन श्रीदेवी डे ओपन जुगाराच्या आकड्यावर पैसे लावून खेळत व खेळवीत असताना १३ डिसेंबर रोजी पोलिसांना आढळून आला, आरोपिकडून जुगाराचे साहित्य व १ हजार ३७० रुपये पोलिसांनी जप्त केले, सतिश भानुदास यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.