राष्ट्र स्वयंसेवक विचारसरणीशी जोडले गेलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा इस्लाम धर्माविषयीचा कौतुकाचा व्हिडिओ आज दि १ डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी इस्लाम धर्मातील शिस्त, भाईचारा आणि मानवी मूल्यांचे विशेष उल्लेख करून प्रशंसा व्यक्त केली. याचबरोबर धर्माच्या नावावर होणाऱ्या राजकारणावर त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली आणि देशात सौहार्द व एकतेची गरज अधोरेखित केली.