लाखांदूर वडसा मार्गावरील चपराड गावाजवळ दोन दुचाकीची भीषण अपघात दोन गंभीर तर दोन किरकोळ युवक जखमी
सोनी चपराड मुख्य मार्गावर बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दुचाकीची समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला या अपघातात दोन्ही युवक गंभीर तर दोन्ही युवक किरकोळ जखमी झाले असून यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे या घटनेची नोंद लाखांदूर पोलिसांनी घेतली आहे