तेल्हारा: उकळी बाजार येथे भव्य श्रीमद भागवत कथा व नामसकिर्तन सोहळ्याला प्रारंभ
Telhara, Akola | Mar 26, 2024 उकळी बाजार येथे २६ मार्च रोजी सकाळपासून भव्य दिव्य श्रीमद् भागवत कथा व नामसकिर्तन सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. या सोहळ्यामध्ये कथा वाचक ह.भ.प. नागेश महाराज आगलावे व किर्तनकार ह.भ.प मोगन महाराज शेगाव, ह.भ.प. गुरुवर्य तुकाराम महाराज, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज मेहुनकर, संजय महाराज देशमुख, गणेश महाराज शेटे, ह.भ.प. कुमारी साक्षी भोपळे यांच्या काल्याचे किर्तन पार पडणार आहे.