बुलढाणा: गोंधनखेड शिवारात २ किलो गांजासह ५७ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
बुलढाणा स्थानिक गुन्हा शाखा पथकाने २३ नोव्हेंबर रोजी बुलढाणा ग्रामीण पोलिस हद्दीत गोंधनखेड शिवारात गांजा विक्री करणाऱ्या एका इसमावर धडक कारवाई करीत त्याच्याकडून ४१ हजार रूपयांचा गांजासह, दुचाकी व मोबाईल असा एकूण ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात केला.याप्रकरणी गणेश साबळे व इतर एका इसमाविरूद्ध बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता पोलिस सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.