जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अंतर्गत आज गुरुवार दि. 15 जानेवारी 2026 रोजी शहरात मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे सुरू आहे. गुरुवार दि. 15 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत असून सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर नागरिकांनी रांगा लावल्या तर काही ठिकाणी दुपारनंतर रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. दुपारी 3.30 वाजेपर्यंत शहरातील मतदानाची टक्केवारी 45.94 होती.