धरणगाव: मुसळी फाट्याजवळ प्रवाशांची लुट करणारे टोळी अवघ्या ४ तासात जेरबंद; धरणगाव पोलीसांची कामगिरी
धरणगाव-जळगाव रोडवर मुसळी फाट्याजवळ रात्री साडेअकरा वाजता बांधकाम कंपनीच्या सुपरवायझरला मारहाण करून ३० हजार लुटणाऱ्या चारही आरोपींना धरणगाव पोलिसांनी अवघ्या चार तासांत गुरूवारी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि लुटलेली बहुतांश रोकड हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.