पुणे शहर: महात्मा फुले वाडा स्मारकाच्या कामाचा स्पीड शून्य, फुलेवाडा परिसरात भुजबळ यांचा माध्यमांशी संवाद
Pune City, Pune | Apr 10, 2025 महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येईल, स्मारकाची रचना आकर्षक आणि भव्य प्रकारची करावी असे अजित पवारांनी सांगितले होते. त्यानंतर पुणे महानगरपालिकेकडून कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु अजूनही कामाला सुरुवात झाली नाही. यावरून आमदार भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली.