जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच निवडणूक प्रक्रिया मुक्त, निर्भय व शांततेत पार पडावी, यासाठी जालना शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात तीन दिवस मद्यविक्री व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले आहेत. दरम्यान मंगळवार दि. 13 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार नियम तोडणार्यावर कडक कारवाई होणार आहे. जालना शहर महानगरपालिकेसाठी बुधवार, दि. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे.