बुलढाणा: नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस कडून लक्ष्मी दत्ता काकास यांचा नामनिर्देशन अर्ज दाखल
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुलढाणा नगरपालिकेत इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी होती.महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या लक्ष्मी दत्ता काकास यांनी आज 17 नोव्हेंबर रोजी दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.यावेळी आ.धीरज लिंगाडे, शिवसेना उबाठा प्रवक्त्या जयश्री शेळके,राष्ट्रवादी शरद पवारचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके,दिलीप जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.बुलढाणा शहराला भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करण्याचा संकल्प लक्ष्मी दत्ता काकस यांनी व्यक्त केला.