दिनांक 9 एप्रिल मंगळवार रोजी संध्याकाळी 5.30 वाजता हिवरखेड वासियांनी तासभर अवकाळी चा थरार अनुभवला.तेल्हारा शहराकडून अवकाळी वारा उधाणाने हिवरखेड शहराकडे धाव घेतली अवकाळी फक्त पावसाच्या स्वरूपात न येता प्रचंड वारा उधान, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आकाशातील काळोख, वावटी, अशी अनेक संकटे सोबत घेऊन आला. अवकाळीची तीव्रता इतकी होती की मोठमोठे अनेक वृक्ष उन्मळून पडले. संत्रा, आंबा, केळी, खरबूज टरबूज, गहू, कांदा, भुईमूग, ज्वारी, भाजीपाला अशा कित्येक फळ भाजीपाला व विविध पिकांचे नुकसान झाले आहे