∆लवकर निदान लवकर उपचार कुष्ठरोग करू हद्दपार कुष्ठरोग शोध अभियानात संशयीत रुग्ण शोधून काढून त्यांच्यावर एमडीटी औषध उपचार सुरू करून संसर्गाची साखळी खंडित करता येते. त्याकरिता घरातील प्रत्येक सदस्याचे कुष्ठरोग तपासणी करणे महत्त्वाचे आहे.तपासणीत व्यक्तीच्या त्वचेवर फिकट लालसर ,रंगाचा बधिर चट्टा जेथे स्पर्श उष्णता किंवा थंडपणा जाणवत नाही आढळल्यास लपवू नका,कुष्ठरोग शोध अभियानात सहभागी होऊन नजीकच्या आरोग्य केंद्रात पूर्ण औषध उपचाराने लवकर निदान करून कुष्ठरोग ठीक होतो.