आज दि 2 फेब्रुवारी दुपारी दोन वाजता पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात ‘लाडकी बहीण’ योजनेवरून टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. आम्ही मते आमच्या कामावर आणि प्रतिमेवर मागत असल्याचे सांगत त्यांनी कुणाची जमीन हडपली नाही, कुणाची टक्केवारी खाल्ली नाही, स्वतःचे गाठोडे बांधले नाही, असा ठाम दावा केला. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या पैशांतून कुणी नवी साडी घेतली नसेल याची शपथ घेत त्यांनी सोन्याच्या वाढत्या किमतींचा उल्लेख केला. पुढे बोलताना त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचा संदर्भ देत, भाषणाला गर्दी येते