आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 वार सोमवार रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील तीर्थक्षेत्र जाळीचा देव येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही यात्रेची आयोजन चक्रधर स्वामी मंदिर समितीच्या वतीने व जाळीचादेव गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते या यात्रेदरम्यान श्री चक्रधर स्वामी यांचा रथ हा संपूर्ण जाळीचा देव गावांमध्ये फिरवत यात्रा आज संपन्न झाली असून या रथाचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त उपस्थित झाले होते.