साकोली: घानोड येथे तंटामुक्त समिती व दारूबंदी समिती,ग्रामपंचायतच्यावतीने राबवली दारूबंदी मोहीम
साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनात घानोड येथे तंटामुक्ती समिती,दारूबंदी समिती तसेच ग्रामपंचायतच्यावतीने व साकोली पोलीस स्टेशन व गावकऱ्यांच्या सहकार्याने मंगळवार दि18 नोव्हेंबरला सकाळी 11 ते सायंकाळी पाच या दरम्यान दारूबंदी मोहीम राबविण्यात आली.यादरम्यान गावात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अवैधरित्या विकली जाणारी मोहाची दारू पकडण्यात आली तिची किंमत 10 हजार रुपये असून दारू विकणाऱ्यांवर साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला