रहीमापुर चिंचोली पोलीस स्टेशन हद्दीतील उमरी बाजार येथे नळाचे पाणी भरण्यावरुन दोन कुटुंबात मारहाण झाल्याची घटना 6 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता घडली याबाबत रहिमापुर चिंचोली पोलीसात एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली. श्यामराव ढोके यांची मुलगी ही घरासमोरील नळावर पाणी भरत होती तेवढ्यात आरोपी जीवन ढोके हा तिच्याघरातुन बाहेर आला व फीचे मुलीला म्हटला की तु नळावर पाणी भरू नको व फीचे मुलीचा गळा दाबला फी हा मुलीला सोडविण्याकरिता गेला असता त्यांना लोटलाट केली.