अकोला जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात किमान तापमानात चढ-उतार पाहायला मिळत असून थंडीचा कडाका वाढला आहे. किमान तापमान १२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहिले असून एकदा तर पारा थेट १०.६ अंशांपर्यंत घसरला. रविवारी किमान तापमान १२.१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. सकाळी थंड वाऱ्यांमुळे हुडहुडी भरत असून विद्यार्थी व नोकरदार नागरिक उबदार कपड्यांचा वापर करत आहेत. दिवसा सौम्य ऊन असले तरी रात्री गारवा वाढत आहे. काही भागांत पहाटे धुक्याची चादर पसरल्याच दिसून येत आहे.