हिंगणघाट: शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाची उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक
हिंगणघाट शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात धडक देऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफी आश्वासन पुर्ण करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा तसेच शेतकऱ्यांवर सोलर पंपाची सक्ती करु नये अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.