राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा जपणारे येथील गुरुदेव सेवा मंडळ, अड्याळ च्या वतीने १९ जानेवारी रोजी भव्य हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाच्या भव्य प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्यात अड्याळ परिसरातील शेकडो महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. गुरुदेव सेवा मंडळ हे केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक कार्यातही अग्रेसर असते. वर्षभर गावात युवकांसाठी सामुदायिक प्रार्थना, ग्रामस्वच्छता अभियान, जिल्हास्तरीय भजन व भारुड मेळावा यांसारख्या उपक्रमांची रेलचेल असते.