मांस तस्करीविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अंतुली शिवारात विना परवाना आणि छुप्या पद्धतीने १३० किलो गोमांसाची वाहतूक करणाऱ्या एका रिक्षेवर पोलिसांनी झडप घातली. या कारवाईत रिक्षासह एकूण ३५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन संशयितांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.