दहेगाव मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एका पट्टेदार वाघाने दर्शन दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही नागरिक चारचाकी वाहनाने दहेगावच्या दिशेने जात असताना, रस्त्यालगत असलेल्या नालीत त्यांना अचानक एक विशाल पट्टेदार वाघ बसलेला दिसला. वाघ दिसताच वाहनधारकांनी प्रसंगावधान राखून गाडी थांबवली आणि हा अंगावर शहारे आणणारा प्रसंग आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. 18 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.