करंजखेडा ते साखरवेल रस्त्यावरून दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर पिशोर पोलिसांनी कारवाई केली. सचिन लक्ष्मण काकुळते (२२, रा. खातखेडा) आणि राजेंद्र चैतराम खलाने (५६, रा. साखरवेल) हे दोघे दुचाकीवरून देशी व विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक करत होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून, त्यांची दुचाकी थांबवून तपासणी केली. एका खोक्यात व पांढऱ्या गोणीत १८,२२० रुपये किमतीच्या १४१ सिलबंद बाटल्या आढळून आल्या.