पो.स्टे.रामटेक अंतर्गत येणाऱ्या नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर असलेल्या आमडी वस्ती चौकात मागून येणाऱ्या एका ट्रॅव्हल्सने नयाकुंड कडून पवनी कडे येणाऱ्या एका दुचाकीस धडक देऊन 50 वर्षीय व्यक्तीस उडविले. यात छिन्नविछिन्न होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवार दिनांक 30 एप्रिलला सकाळी नऊ वाजता चे दरम्यान घडली. मृतकाचे नाव रमेश बिरसाल वय 50 वर्षे रा. नयाकुंड असे आहे. तो पिकअप वाहनांद्वारे मजुरांचे कामाचे साइटवर ने - आण करायचा.त्यांचे पेमेंट करायला तो जात होता.