महाशिवरात्रीनिमित्त वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग येथे येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, यंदा गाभाऱ्याबाहेरूनच दर्शन देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.आज दि ३ फेब्रुवारी रोजी दुपारी साडे चार वाजता मंदित परिसरात झालेल्या आढावा बैठकीत दिलीप स्वामी यांनी मंदिर विश्वस्त समितीला तशा सूचना दिल्या. या वेळी एकल दर्शन रांग, प्रवेशद्वाराजवळ प्रसाद वाटप व सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर भर देण्यात आला.महाशिवरात्रीला शिवलिंगावर चंदनाचे पालेले लावण्यास बंदी राहणार आहे.