जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. बुधवार दि. 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जालना शहरातील सर्व 291 मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली असून, 291 मतदान पथकांना आज संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त आशिमा मित्तल यांनी दिली.