केज: मस्साजोग येथे स्वर्गीय संतोष देशमुखांच्या कुटुंबाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली भेट
Kaij, Beed | Nov 29, 2025 केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवार, 29 नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे 1 वाजता मस्साजोग येथे भेट दिली. अजित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेत, त्यांच्या दुःखात सहानुभूती व्यक्त केली. तसेच न्याय मिळवण्यासाठी सरकारकडून आवश्यक ती मदत केली जाईल, असेही त्यांनी यावेळी आश्वासन दिल्याचे