वरली मटका नावाचा जुगार खेळणाऱ्या एका इसमास पिंपळगाव राजा पोलिसांनी २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान पिंपळगांव राजा येथील आठवडी बाजार येथे पकडले.व त्याच्या ताब्यातून २१५ रुपयाचा जुगार साहित्य जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनचे पो कॉ नितीन खरात यांनी पिंपळगांव राजा येथील आठवडी बाजार येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून धम्मपाल बलदेव सरदार वय 45 वर्ष रा. कासारखेड, यास पकडले.