गेवराई तालुक्यातील नांदलगाव येथे कार्यरत असलेल्या एका ग्रामरोजगार सेवकावर टोळक्याने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित सेवकाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्याला गोड बोलून एका ठिकाणी बोलावून घेण्यात आले आणि त्यानंतर त्याचे हातपाय बांधून काठ्या व रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. पीडिताच्या म्हणण्यानुसार, ही मारहाण अनेक जणांनी मिळून टोळक्याने केली. हा प्रकार सुरू असताना आजूबाजूला लोक उपस्थित असूनही कोणीही मदतीला धावून आले नाही, अशी खंत त्याने व्यक्त केली.