छत्रपती संभाजीनगर:नवजात अर्भकाला सिडको बसस्थानकावर टाकून जन्मदाते पसार झाल्याची घटना 4 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडको एमआयडीसी ठाण्याचे संजयकुमार रूस्तुमराव साबळे यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार 4 फेबु्रवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नियंत्रण कक्षाला माहिती दिली होती.