देवळी: आमदार राजेश बकाणे,माजी खासदार तडस यांच्या नेतृत्वात भव्य 'विजयसंकल्प यात्रा';देवळी शहर झाले भगवामय
Deoli, Wardha | Nov 16, 2025 देवळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीतील आजचा दिवस भारतीय जनता पक्षासाठीअत्यंत महत्त्वाचा ठरला. विकासाचा 'विजयसंकल्प' घेऊन भाजपने नगराध्यक्ष पदासह सर्व २० नगरसेवक पदांच्या उमेदवारांचे अर्ज आज शहरात मोठ्या उत्साहात दाखल केले.पक्षाची ही अर्जदाखल प्रक्रिया 'विजयसंकल्प यात्रे'च्या माध्यमातून पार पडली. स्थानिक आमदार राजेश बकाने आणि माजी खासदार रामदास तडस यांनी या भव्य यात्रेचे नेतृत्व केले. असल्याचे आज 16 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता प्रसिद्ध दिले